नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकार तिसऱ्या टप्प्यातले लसीकरण पुढच्या महिन्यात सुरू करेल, अशी माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांनी दिली.

या टप्प्यात पन्नास वर्षांपुढील व्यक्तींचा समावेश असणार आहे. आरोग्य मंत्रालयासाठी अर्थसंकल्पीय तरतुदींबाबत माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

कोविड-१९ प्रतिबंधासाठी पहिल्या टप्प्यात आरोग्यसेवकांना आणि दुसऱ्या टप्प्यात अनुषंगिक सरकारी कर्मचाऱ्यांना लसीकरण करण्यात येत असून, पहिल्या टप्प्यातल्या आरोग्यसेवकांना या महिन्याच्या तेरा तारखेपासून लसीची दुसरी मात्रा देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.