पिंपरी : अखिल सार्वजनिक शिवजयंती उत्सव मोहननगर, रामनगर, चिंचवड स्टेशन, काळभोरनगर यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त स्टार हाॅस्पिटल व स्वास्थ मेडीकल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमानाने मोफत आरोग्य शिबिर आयोजित केलं होतं.

मोहननगर येथे श्री.छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीचे पुजन करून कार्यक्रमास सुरवात करण्यात आली. यावेळी शिवसेना सहसंपर्कप्रमुख कामगार नेते इरफानभाई सय्यद, मा. नगरसेवक प्रसादभाई शेट्टी, मनसे उपाध्यक्ष दत्ता देवतरासे, सा.कार्यकर्ते गणेश लंगोटे, संजय जगताप, गणेश दातीर पाटील, संदिप बामणे, राहुल दातीर पाटील, कामगार नेते किरण देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेस नेते विशालशेठ काळभोर, शिवसेना महिला प्रमुख माधुरी ताई पाटील, शिवसेना विभागप्रमुख सोमनाथ अलंकार, सामाजिक कार्यकर्ते राहुल कोल्हटकर,  सुदेश चव्हाण, अविनाश गायकवाड, मंगेश थोरात, अभिजित वेंगुर्लेकर, सुरज मिर्गे,  सुरज कावळे व परिसरातील महिला, युवक उपस्थित होते.

स्टार हाॅस्पिटल सौजन्याने घेण्यात आलेल्या आरोग्य शिबिराचा लाभ आरोग्य कर्मचारी तसेच परिसरातील लोकांनी घेतला यात १०० लोकांची तपासणी करण्यात आली.