नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : स्टेट बँक आँफ इंडियाने गृहकर्जावरील व्याजाचा दर कमी केला आहे. आता हा दर ६ पूर्णांक ७ दशांश टक्के असणार आहे.
७५ लाखांपर्यंत कर्जासाठी हा दर ६ पूर्णांक ७ दशांश टक्के असेल तर ७५ लाख वरच्या कर्जासाठी हा दर पावणेसात टक्के असेल. हा निर्णय दिनांक ३१ मार्च २०२१ पासून अंमलात येईल. जागतिक महिला दिनानिमित्त महिलांना कर्जात अर्धा टक्का अधिक सवलत देण्यात आली आहे.