मुंबई (वृत्तसंस्था) : मास्क न घालणाऱ्या १८ लाखांहून अधिक लोकांवर मुंबई महानगरपालिकेनं दंडात्मक कारवाई केली आहे. गेल्या वर्षभरात ३७ कोटींहून अधिक दंड महानगरपालिकेनं वसूल केला आहे. दरम्यान, मुंबईत निवासी इमारतींमध्ये ९० टक्के कोविड सक्रिय रुग्ण आहेत.

संसर्ग रोखण्याच्या दृष्टीनं घर कामगार, दूध विक्रेते, वर्तमानपत्र विक्रेते, सुरक्षा रक्षक यांची कोरोना चाचणी करण्याचा निर्णय मुंबई महानगरपालिकेनं घेतला आहे.