नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आयुर्वेद म्हणजे सर्वंकष मानवशास्त्र असून, आयुर्वेदाला चालना देण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य केलं जाईल असं आश्वासन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिलं आहे.

ते काल संध्याकाळी जागतिक आयुर्वेद महोत्सवाला संबंधोत करताना बोलत होते.

आयुर्वेदामुळे रोग प्रतिकार क्षमता वाढायला मदत होते याविषयी आता लोकांना कळू लागलं आहे, आयुर्वेदासह पारंपरिक उपचार पद्धतींचा जागतिक पातळीवर प्रचार प्रसार करण्यासाठी सध्याचा काळ सर्वोत्तम काळ आहे असंही ते म्हणाले.

पारंपरिक औषधांसाठी भारतात केंद्र सुरु करायचा निर्णय जागतिक आरोग्य संघटनेनं घेतला आहे अशी माहितीही त्यांनी दिली.