नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या विद्यार्थ्यांसाठी या महिन्यात होणाऱ्या आगामी परीक्षा पे चर्चा कार्यक्रमासाठी देशभरातून १० लाख ३२ हजार विद्यार्थ्यांनी नावनोंदणी केली आहे. तसच २ लाख ६० हजार शिक्षक आणि ९४ हजार पालकांनी हि या कार्यक्रमासाठी नावनोंदणी केली आहे.
नावनोंदणी करायचा कालचा शेवटचा दिवस होता. देशातील विद्यार्थ्यांना परीक्षेबाबत ची भीती आणि तणाव दूर करून आत्मविश्वासपूर्वक परीक्षेला समोर जाण्यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी पंतप्रधान मोदी दरवर्षी हा उपक्रम घेत आहेत. यावर्षी होणारा कार्यक्रम चौथा आहे आणि तो आभासी माध्यमातून होणार आहे.
यामध्ये सहभागी होण्यासाठी देशातून एकंदर २ हजार विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांची निवड करण्यात येणार असून, त्यापैकी काही जणांना पंतप्रधानांना प्रश्न विचारायची संधी मिळणार आहे. या कार्यक्रमासाठी निवड झालेल्या प्रत्येकाला परीक्षा पे चर्चा कीट आणि प्रमाणपत्रही देण्यात येणार आहे.
तर प्रश्न विचारणाऱ्या काही निवडक जणांना पंतप्रधानांच्या सही असलेलं त्यांचं विशेष छायाचित्रंही भेट दिलं जाणार आहे