नवी दिल्ली : देशाचे माजी प्रधानमंत्री राजीव गांधी यांची 28 वी पुण्यतिथी ‘दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिन’ म्हणून मंगळवारी महाराष्ट्र सदन व महाराष्ट्र परिचय केंद्रात ‘दहशतवाद व हिंसाचार विरोधी’ शपथ घेण्यात आली.
कोपरनिकसमार्ग स्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात निवासी आयुक्त समीर सहाय यांनी माजी प्रधानमंत्री राजीव गांधी यांच्या प्रतिमेस अभिवादन केले. श्री.सहाय यांनी उपस्थित अधिकारी-कर्मचाऱ्यांना ‘दहशतवाद व हिंसाचार विरोधी’ शपथ दिली. सहायक निवासी आयुक्त सुमन चंद्रा, विजय कायरकर, अजितसिंग नेगी यांच्यासह महाराष्ट्र सदन तसेच महाराष्ट्र परिचय केंद्राचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
महाराष्ट्र परिचय केंद्रात ‘दहशतवाद व हिंसाचार विरोधी‘ दिनाचे आयोजन
महाराष्ट्र परिचय केंद्रात ‘दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिन’ पाळण्यात आला. परिचय केंद्राचे उपसंचालक दयानंद कांबळे यांनी माजी प्रधानमंत्री राजीव गांधी यांच्या प्रतिमेस अभिवादन केले. त्यांनी उपस्थित अधिकारी व कर्मचा-यांना ‘दहशतवाद व हिंसाचार विरोधी’ शपथ दिली. जनसंपर्क अधिकारी अमरज्योतकौर अरोरा, उपसंपादक रितेश भुयार यांच्यासह कार्यालयातील कर्मचारी आणि अभ्यागत उपस्थित होते.