नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज वाहनं भंगारात काढण्याचं धोरण लोकसभेत मांडलं. अपात्र आणि प्रदूषणकारी वाहनं भंगारात काढल्यानं मोठं परिवर्तन घडून येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यामुळे इंधन क्षमतेत तसंच रस्ता सुरक्षेत वाढ होऊन गुंतवणुकीचा ओघही वाढेल, इतर उद्योगांना स्वस्त कच्चा माल उपलब्ध होऊन केंद्र आणि राज्य सरकारांचा महसूल वाढेल, देशात ३ कोटी ७० लाख रोजगार निर्माण होईल, असं त्यांनी सांगितलं जुन्या वाहनधारकांना सवलत दिली जाईल, असही त्यांनी स्पष्ट केलं आगामी पाच वर्षांमध्ये जागतिक  वाहन क्षेत्रात भारत अग्रस्थान मिळवेल, तसंच इलेक्ट्रिक वाहनांसाठी उपयुक्त अशा लिथियम आयन बॅटऱ्यांचं १०० टक्के उत्पादन पुढच्या वर्षभरात देशात होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.