मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात काल २० हजार ४४४ रूग्णांनी कोरोनावर मात केली. राज्यात आतापर्यंत २२ लाख ८३ हजार ३७ रुग्ण, कोरोनामुक्त झाले आहेत.
राज्यातलं रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८७ पूर्णांक ७८ शतांश टक्के झालं आहे. काल ३५ हजार ९५२ नवीन रुग्णांची नोंद झाली, त्यामुळे राज्यातल्या कोविड बाधितांची एकूण संख्या २६ लाख ८३३ झाली आहे. सध्या राज्यभरात दोन लाख ६२ हजार ६८५ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. काल १११ रुग्णांचा मृत्यू झाला.
राज्यात या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, ५३ हजार ७९५ झाली असून, मृत्यूदर २ पूर्णांक ९ दशांश टक्के झाला आहे.