नवी दिल्ली (वृत्तसंस्था) :  कॅनडाच्या आश्ली बार्टी हिने सलग दुसऱ्यांदा मायामी खुली टेनिस स्पर्धेतील महिला एकेरीमधील विजेतेपद पटकावलं आहे. प्रतिस्पर्धी बियांका आंद्रेस्कू हीला घोट्याच्या दुखापतीमुळे सामना सोडवा लागला. तर पुरुषांच्या स्पर्धेत आज इटलीचा किशोरवयीन खेळाडू जानिक सिनर आणि हुबर्ट हुरकझ यांच्यात लढत होणार आहे. तर दुहेरीत क्रोएशियाच्या निकोला मेकटीक आणि मेट पव्हीक जोडीनं ब्रिटिश जोडी डन एव्हान्स आणि नील स्कूपस्की जोडीचा पराभव करत जेतेपद पटकावलं.