ही भिन्न पद्धत वित्त (क्र. 2) कायदा, 2019 ची निर्मिती नाही
नवी दिल्ली : केंद्रीय वित्त आणि कॉर्पोरेट मंत्री निर्मला सीतारामन यांनी 23 ऑगस्ट 2019 रोजी पत्रकार परिषदेद्वारे अर्थव्यवस्थेला चालना देणाऱ्या अनेक रचनात्मक उपायांची घोषणा केली. त्यामध्ये विदेशी प्रतिभूती किंवा रोखे गुंतवणूकदार अर्थात एफपीआय आणि देशांतर्गत गुंतवणूक (एआयएफ वर्गवारी III) सह यांच्यात भिन्न पद्धत निर्माण करण्यात आली आहे, असे चुकीचे आकलन काही माध्यमांनी केले आहे.
मात्र ही पद्धत सर्वसाधारण अर्थसंकल्प 2019 च्या पूर्वीपासून अस्तित्वात होती. त्यामुळे ही पद्धत वित्त (क्र. 2) कायदा 2019 ची निर्मिती नाही किंवा वित्त मंत्र्यांनी 23 ऑगस्ट 2019 ला केलेल्या घोषणांपैकीही नाही, असे सीबीडीटी अर्थात केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने स्पष्ट केले आहे.
सीबीडीटीने याबाबत म्हटले आहे की परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार (एफपीआय), प्राप्तिकर कायदा 1961 यामध्ये व्युत्पन्नापासून (डेरिव्हेटिवज) मिळणाऱ्या उत्पन्नावरील कराकरिता विशेष तरतुदी (कायद्यातील कलम 115 एडी सोब 2(14) वाचावे) आहेत. या पद्धतीमध्ये एफपीआयचे डेरिव्हेटिवजपासून मिळणारे उत्पन्न भांडवली नफा म्हणून बघितले जाते आणि कायद्यातील 115 एडी कलमनुसार विशेष कर दरास पात्र ठरते. मात्र देशांतर्गत गुंतवणूकदारांचे पर्यायी गुंतवणूक निधींसह (एआयएफ) वर्गवारी – III तसेच परदेशी गुंतवणूकदार जे एफपीआय नाहीत, त्यांचे व्युत्पन्नापासूनचे (डेरिव्हेटिवज) उत्पन्न भांडवली नफ्याऐवजी व्यावसायिक उत्पन्न म्हणून समजले जाते आणि त्यावर सर्वसामान्य प्राप्तिकर दराने कर आकारला जातो. एफपीआयसाठीची ही भिन्न पद्धत कलम 115 एडीच्या माध्यमातून आधीपासूनच अस्तित्वात आहे. त्यामुळे एफपीआय आणि देशांतर्गत गुंतवणूकदार यांच्यासाठी वेगवेगळी पद्धत सर्वसाधारण अर्थसंकल्प 2019 किंवा वित्त मंत्र्यांनी 23 ऑगस्ट 2019 ला केलेल्या घोषणेचा भाग आहे, असे म्हणणे चुकीचे आहे.