मुंबई (वृत्तसंस्था) : राज्य विधीमंडळाच्या सर्व सदस्यांना आपल्या आमदार निधीपैकी १ कोटी रुपये आपापल्या मतदारसंघात कोविड उपचारासंदर्भात सोयीसुविधांच्या कामांसाठी वापरायला राज्यसरकारनं परवानगी दिली आहे.
उपमुख्यमंत्री अर्थमंत्री अजित पवार यांनी घोषणा केली. सरकारनं घातलेल्या निर्बंधाचं पालन केलं नाही, तर गेल्या वर्षीप्रमाणे कडक लॉकडाऊन करावा लागेल, असा इशाराही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला आहे.
काही रुग्णांचे नातेवाईक रेमडेसिवीर औषधाचा वापर करण्यासाठी खाजगी रुग्णालयातल्या डॉक्टरांवर दबाव आणत आहेत. मात्र डॉक्टरांनी केवळ गंभीर रुग्णांसाठीच रेमडेसिवीरचा वापर करावा, असं आवाहन त्यांनी केलं.