पुणे : धार्मिक अल्पसंख्याक विद्यार्थ्यांचे बाहुल्य असलेल्या शासनमान्य शैक्षणिक संस्थांना पायाभूत सोयी सुविधा उपलब्ध करून देऊन शिक्षणाचा गुणात्मक दर्जा उंचावण्यासाठी अल्पसंख्याक बहुल शासनमान्य खाजगी शाळा, कनिष्ठ महाविद्यालय, औद्योगिक प्रशिक्षण संस्था,नगरपालिका, नगरपरिषद शाळा व अपंग शाळांमध्ये पायाभूत सोयी-सुविधा पुरविण्यासाठी अनुदान देण्याच्या योजनेस अल्पसंख्यांक विकास विभाग महाराष्ट्र शासनाचे परिपत्रक क्रमांक अवि वि 2019/प्र.क्र.99/का-६, दि.14 मे 2019 अन्वय सन19- 20 मध्ये राबविण्यात येणार आहे. योजनेचे सन 19-20 साठीचे परिपूर्ण प्रस्ताव,अल्पसंख्यांक बहुल शासनमान्य खाजगी शाळा, कनिष्ठ महाविद्यालय,औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नगरपालिका, नगरपरिषद शाळा व अपंग शाळा यांनी दिनांक 31 ऑगस्टपर्यंत जिल्हा नियोजन समिती, जिल्हा नियोजन कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय, बी विंग, पहीला मजला, पुणे येथे कार्यालयीन वेळेत सादर करावा,

अशी माहिती सहाय्यक जिल्हा नियोजन अधिकारी इंदलकर किरण यांनी दिली आहे.