मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातल्या १८ ते ४५ वयोगटातल्या नागरिकांना मोफत लस दिली जाणार असल्याचा निर्णय झाल्याची माहिती अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली. मंत्रीमंडळाच्या गेल्या बैठकीत यासंदर्भात चर्चा झाली आणि मुख्यमंत्र्यांनी याला होकार दर्शवल्याचे ते म्हणाले.

यासाठी राज्य सरकार जागतिक पातळीवर निविदा मागविणार असल्याचेही त्यांनी सांगितले. लसीकरणासंदर्भात राज्य सरकारने एक उच्चस्तरीय समिती स्थापन केली असून ही समिती लसीकरणासंदर्भात राज्य सरकारला लवकरच शिफारस करणार आहे.

त्या समितीच्या शिफारसींनुसार राज्यातल्या नागरिकांच्या लसीकरणाचा निर्णय घेतला जाईल, अशी माहिती राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली आहे.