नवी दिल्ली : भारत आणि गांबिया यांच्यात पारंपरिक औषध प्रणाली क्षेत्रातल्या सहकार्यासाठीच्या सामंजस्य कराराला, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या, केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बैठकीत, पूर्वलक्षी प्रभावाने मान्यता देण्यात आली. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या गांबिया दौऱ्यादरम्यान, 31 जुलै 2019 ला या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या झाल्या होत्या.
भारत आणि गांबिया यांच्यात पारंपरिक औषध प्रणालीच्या प्रोत्साहनासाठी हा सामंजस्य करार, रूपरेखा प्रदान करेल. त्याचबरोबर, या क्षेत्रात दोन्ही देशांना त्याचा लाभ होईल. सामंजस्य करारामुळे, गांबियामधे, आयुष प्रणालीच्या महत्वाला चालना मिळेल.
या सामंजस्य करारामुळे, वैद्यक व्यवसायिकांना प्रशिक्षण देण्यासाठी तज्ञ तसेच पारंपारिक औषध प्रणाली क्षेत्रात संशोधनासाठी, सहयोगात्मक संशोधन करणाऱ्या वैज्ञानिकांचे आदान-प्रदान होऊन पारंपरिक औषध आणि औषध विकास क्षेत्रात नाविन्यतेला वाव मिळेल.