मुंबई (वृत्तसंस्था) : वैद्यकीय ऑक्सिजनचा अपव्यय टाळण्यासाठी रुग्णालयांमध्ये वेगळ्या ऑक्सिजन परिचारिका नेमण्याची गरज आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केली आहे.
या परिचारिका केवळ ऑक्सिजनचा साठा, पुरवठा आणि वितरण याकडेच लक्ष देतील आणि त्याच्या तपशीलवार नोंदी ठेवतील. नंदुरबारमध्ये असा प्रयोग यशस्वी झाला असून आता राज्यातल्या सर्व सरकारी रुग्णालयांनी अशा प्रकारची तरतूद करावी अशा सूचना शासनानं जारी केल्या आहेत.
आतापर्यंत एक परिचारिका ४५ ते ५० रुग्णांची देखभाल करीत असे. आता १५ ते २० रुग्णांसाठी एक परिचारिका असं प्रमाण राहील.