नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आतापर्यंत देशात १६ कोटी ७१ लाख लसींच्या मात्रा देण्यात आल्या आहेत. लस घेणाऱ्यांमध्ये ९५ लाख १९ हजार आरोग्य कर्मचाऱ्यांनी पहिली मात्रा, तर ६४ लाख आरोग्य कर्मचाऱ्यांनी दुसरी मात्राही घेतली असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं म्हटले आहे. या बरोबरच पहिल्या फळीतले १ कोटी ३८ लाख कर्मचाऱ्यांनाही लसीची पहिली मात्रा, तर ७६ लाख कर्मचाऱ्यांना दुसरी मात्रा दिली आहे. जगातली सगळ्यात मोठ्या लसीकरण मोहिमेला १६ जानेवारी २०२१ मध्ये सुरुवात करण्यात आली होती.