नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात आतापर्यंत कोविडवरील लसीच्या १७ कोटी ५१ लाखांहून अधिक मात्रा देण्यात आल्या आहेत. यात ९५ लाख ८१ हजारांहून अधिक आरोग्य कर्मचाऱ्यांचा समावेश असून त्यांनी लसीची पहिली मात्रा घेतली आहे तर ६५ लाखांपेक्षा अधिक आरोग्य कर्मचाऱ्यांनी लसीची दुसरी मात्रा घेतली आहे.
फ्रंटलाईन वर्कर्समधल्या १ कोटी ४१ लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांनी पहिली तर ६५ लाखांपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांनी लसीची दुसरी मात्रा घेतली. काल २३ लाख ८५ हजार नागरिकांना लस देण्यात आल्याची माहिती केंद्रिय आरोग्य मंत्रालयानं दिली आहे.