नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात काल ३ लाख ६२ हजार ७२७ नव्या कोविड रुग्णांची नोंद झाली, ३ लाख ५२ हजारापेक्षा जास्त रुग्ण बरे होऊन घरी गेले, तर ४ हजार १२० रुग्णांचा मृत्यू झाला. देशात आतापर्यंत २ कोटी ३७ लाखापेक्षा जास्त लोकांना कोरोनाची लागण झाली. त्यापैकी आतापर्यंत १ कोटी ९७ लाखापेक्षा जास्त रुग्ण बरे झाले आहेत.
देशातल कोरोनामुक्तीचा दर ८३ पूर्णांक २६ शतांश टक्के झाला आहे. सध्या देशभरात ३७ लाख १० हजारापेक्षा जास्त अॅक्टीव्ह रुग्ण आहेत. ही संख्या आजपर्यंत बाधीत झालेल्या रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत १५ पूर्णांक ६५ शतांश टक्के आहे.
देशात आतापर्यंत कोविड प्रतिबंधक लशीच्या १७ कोटी ७२ लाखापेक्षा जास्त मात्रा लाभार्थ्यांना दिल्या आहेत. काल १८ लाख ९४ हजारापेक्षा जास्त लाभार्थ्यांना लस दिल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं सांगितलं.