मुंबई: आंतरराष्ट्रीय ई-कॉमर्स इनेबलर शॉपमॅटिकने स्थापनेपासूनच एसएमबी आणि वैयक्तिक उद्योजकांसाठी ऑनलाइन बिझनेस यशस्वी करून दिला आहे. उद्योगांना ऑनलाइन होण्याकरिता मदतीसाठीच्या नव्या उपक्रमात शॉपमटिकने ३ जून ते ३१ ऑगस्ट २०२१ दरम्यान साइन अप करणाऱ्या यूझर्सना शून्य होस्टिंग चार्जेसची सुविधा दिली आहे. सध्याच्या प्रोत्साहनपर कालावधीत, व्यापाऱ्यांना त्यांची ऑनलाइन उपस्थिती दर्शवण्यासाठी शॉपमॅटिक वेबस्टोअर, शॉपमॅटिक चॅट, शॉपमॅटिक सोशल किंवा शॉपमॅटिक मार्केटप्लेस या उपलब्ध ४ पैकी कोणताही एक पर्याय निवडता येईल.

‘इन्स्पायरिंग इंटरप्रीनिअरशिप प्रोग्राम’ चा भाग म्हणून कोणतेही व्यापारी साइन-अप शुल्क न भरता शॉपमॅटिकचा प्लॅटफॉर्म वापरून त्यांचे ई कॉमर्सचे ऑनलाइन अस्तित्व दर्शवता येईल. फक्त जेव्हा विक्री होईल, त्यावेळी त्यांना ३ टक्के प्रति व्यवहार शुल्क द्यावे लागेल. नवोदित उद्योजक आणि लहान उद्योगमालकांना, विशेषत: सध्याच्या संकट काळात त्यांचा बिझनेस ऑनलाइन करण्यासाठी प्रोत्साहन देण्याकरिता हे पाऊल उचलण्यात आले आहे.

शॉपमॅटिकचे सीईओ आणि सह संस्थापक, अनुराग अवुला म्हणाले, “सध्याच्या आव्हानात्मक काळात, व्यवसायांना ऑनलाइन विक्रीत मदतीकरिता आमच्या अखंड प्रयत्नांमध्ये, व्यवसायांना ऑनलाइन होण्याकरिता पुढील ९० दिवस मासिक होस्टिंग फी रद्द करत ही सुविधा आणखी सोपी करत आहोत. आम्ही आमच्या मार्केटमध्ये एसएमई आणि वैयक्तिक उद्योजकांना होस्टिंग फी नसलेल्या प्लॅटफॉर्मवर साइन अप करण्यासाठी प्रोत्साहित करतो आणि शॉपमॅटिकचा प्लॅटफॉर्मचा फायदा घेत ऑनलाइन व्यापारात यश मिळवून देऊ शकतो.”

“आम्ही उद्योगांना मार्केटप्लेसमध्ये विक्री करण्यास मदत करतो. तसेच त्यांच्या बिझनेससाठी पूर्ण क्षमतेचे ई कॉमर्स स्टोअर्स तयार करण्यासाठीही मदत करतो. अशा उद्योगांसाठी, शॉपमॅटिक त्यांचे ईकॉमर्स स्टोअर्स तयार करुन देत तसेच ऑनलाइन-रेडी होण्याकरिता ई कॉमर्स मूल्य साखळीतील सर्व घटक व्यवस्थापित करून देतो. या घटकांमध्ये सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन, फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर त्यांचे सोशल अस्तित्व तयार करणे, गूगल अॅनलिटिक्स सेट करणे, विविध पेमेंट आणि शिपिंग पर्याय उपलब्ध करणे आदींचा समावेश आहे. या उपक्रमाद्वारे अनेक उद्योगांना सध्याच्या संकटकाळात, एक पर्यायी महसूलाचा स्रोत तयार करून मदत करण्यात आली. या उपक्रमात पॅकेज्ड एफअँडबी, ग्रॉसरीज, फॅशन, खेळणी, स्पोर्ट्सवेअर, कॉस्मॅटिक, दागिने आणि ऑरगॅनिक उत्पादने इत्यादी श्रेणीतील उद्योगांना आधार देण्यात आला” असे श्री अवुला म्हणाले.