मुंबई (वृत्तसंस्था) : खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना ३ लाख रुपये बिनव्याजी देण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला.

पूर्वी व्याजदरात १ टक्का सूट देण्यात आली होती. शेतकऱ्यांना केवळ २ टक्के व्याज दर भरावा लागत असे आता तोही भरावा लागणार नाही. या निर्णयाचा फायदा राज्यातल्या १ कोटी ६२ लाख शेतकऱ्यांना मिळणार आहे राज्यात १४१ लाख हेक्टर क्षेत्रावर खरीप पिक घेतलं जातं.