नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतानं आतापर्यंत कोविड प्रतिबंधक लशीच्या २५ कोटीहून अधिक मात्रा लाभार्थ्यांना देत महत्वाचा टप्पा पार केला आहे. काल देशभरात ३१ लाख ६७ हजारांपेक्षा जास्त मात्रा लाभार्थ्यांना दिल्या.

त्यामुळे ही संख्या एकूण २५ कोटी २८ लाखाच्या वर गेली आहे. त्यापैकी सुमारे ४ कोटी ८२ लाख नागरिकांना लसीच्या दोन्ही मात्रा दिल्यानं त्यांचं लसीकरण पूर्ण झालं आहे. लसीकरण मोहीम सुरू झाल्यापासून १४८ दिवसात भारतानं हा टप्पा ओलांडला आहे.

यात ४ कोटीपेक्षा जास्त मात्रा १८ ते ४५ वर्ष वयोगटातल्या लाभार्थ्यांना दिल्या असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं सांगितलं.