मुंबई : शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरचे उपकेंद्र तासगाव येथे सुरू करण्यास तत्वतः मान्यता दिली असून  उपकेंद्र सुरू करण्याची प्रक्रिया लवकर पूर्ण करावी, असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.

शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र तासगाव येथे सुरू करण्यासंदर्भात बैठक झाली. बैठकीला आमदार सुमनताई पाटील,  उच्च  शिक्षण विभागाचे संचालक धनराज माने, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.डी. टी. शिर्के, ॲड. धैर्यशील पाटील, रोहित पाटील, व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

श्री.सामंत म्हणाले, राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आर.आर.पाटील (आबा) यांचे शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरचे उपकेंद्र तासगाव येथे सुरू व्हावे असे अनेक दिवसांपासूनचे स्वप्न होते ते पूर्ण करण्याची संधी मला मिळाली ही समाधानकारक बाब आहे. या उपकेंद्रामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा उपलब्ध होईल. उपकेंद्र तातडीने सुरू करण्यासाठी शासनस्तरावर सर्व सहकार्य करण्यात येईल, असेही श्री. सामंत यांनी यावेळी सांगितले.