नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय युद्धनौका तबर, अफ्रिका आणि युरोपच्या प्रवासाला निघाली आहे. सप्टेंबरच्या अखेरपर्यंत अनेक बंदरांना भेटी दिल्यानंतर तबर अनेक मित्र राष्टांच्या नौसेने बरोबर युद्धाभ्यास करेल. अदेनची खाडी, लाल समुद्र, सुएझ कालवा आणि अन्य समुद्र धुनीतून ती प्रवास करेल. अन्य देशांबरोबर असलेले मैत्रीचे संबंध तसंच तटवर्तीय सुरक्षा अधिक वृद्धींगत करण्याचा या प्रवासा मागचा हेतू आहे. तबर २२ जुलै ते २७ जुलै दरम्यान होणाऱ्या रशियन नौसेना दिवसाच्या सोहळ्यातही सहभागी होणार आहे.