नवी दिल्ली : ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ अभियानाची यशस्वी अंमलबजावणी करणाऱ्या राज्ये आणि जिल्ह्यांचा केंद्रीय महिला आणि बाल कल्याण मंत्री स्मृती इराणी यांच्या हस्ते नवी दिल्लीत गौरव करण्यात येणार आहे. स्त्री-पुरुष जन्मदर गुणोत्तर सुधारण्यासाठी जनजागृतीसाठी उत्कृष्ट काम करणाऱ्या राज्ये आणि जिल्ह्यांचा गौरव करणे हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे.
यावेळी 5 राज्यांचे प्रधान सचिव/आयुक्त, नऊ राज्यातल्या 10 जिल्ह्यातले जिल्हा दंडाधिकारी/उपायुक्त यांचा सत्कार करण्यात येणार आहे. याशिवाय जनजागृतीसाठी उत्तम काम करणाऱ्या 8 राज्यातल्या 10 आणखी जिल्ह्यातल्या जिल्हा दंडाधिकारी/उपायुक्तांनाही गौरवण्यात येणार आहे.