नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : तेल विपणन कंपन्यांकडून इथनॉल मिश्रित पेट्रोलला प्रोत्साहन देण्यासाठी इथनॉलच्या परिवहन दरात बदल करण्यात आला आहे. राष्ट्री य जैव इंधन-2018 च्या इथनॉल मिश्रित धोरणानुसार सरकारी तेल विपणन कंपन्या – इंडियन ऑयल कॉरपोरेशन, भारत पेट्रोलियम कॉरपोरेशन आणि हिन्दुस्ताणन पेट्रोलियम कॉरपोरेशनला पेट्रोलमध्ये इथनॉल मिसळण्याच्या सूचना दिल्या आहेत. जास्त प्रमाणात स्वदेशी इथॅनॉल मिसळल्यानं भारताच्या तेल आयात खर्चात वर्षाकाठी 4 बिलियन अमेरिकी डॉलर इतकी घट होऊ शकते. 2023 पर्यंत केंद्र सरकारनं पेट्रोलमध्ये 20 टक्के इथॅनॉल मिसळण्याचं लक्ष्य निश्चित केलं आहे. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयानं 28 जून रोजी 12 ते 15 टक्के इथेनॉल मिश्रित पेट्रोलवर चालणाऱ्या वाहन निर्मितीस चालना देण्यासाठी अधिसूचना जारी केली आहे.