नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जॉन्सन अँड जॉन्सन या कंपनीच्या एक मात्रा असलेल्या कोविड-१९ लसीला भारतात आपातकालीन वापरासाठी मंजुरी देण्यात आली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय यांनी काल याबाबतची घोषणा केली. भारताकडे आता ५ लसी आहेत. याद्वारे आपल्या देशाच्या सामूहिक कोरोना लढ्यास बळ प्राप्त होईल असं मांडविया यांनी आपल्या ट्वीट संदेशात म्हटलं आहे. यापूर्वी सीरम इंस्टीट्यूट ऑफ इंडिया, भारत बायोटेक तसेच रशियाच्या स्पुतनिक व्ही कोरोना लसीला अत्यावश्यक आणि आपातकालीन परिस्थितीत सीमित वापरासाठी मंजुरी दिली होती. या सर्व लसींच्या २ मात्रा द्याव्या लागतात. जॉन्सन अँड जॉन्सनची लस एकाच मात्रेची आहे.