नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आझादी का अमृत महोत्सव वर्षानिमित्त नांदेड तालुक्यातल्या सोमेश्वर ईथं नाबार्ड आणि महाराष्ट्र ग्रामीण बँक यांच्या संयुक्त विद्यमानं एटीएम चा वापर, अटल पेंशन, जनधन बँक खाते, विमा खाते, किसान क्रेडिट कार्ड खाते, बँक कर्ज परत फेड योजना लाभ, आदि योजनांवर मार्गदर्शन शिबीर आयोजित केलं होतं. शेतकऱ्यांनी बँकांच्या विविध योजनांचा सुयोग्य लाभ घेऊन आपल्या जीवनात आर्थिक क्रांती घडवून आणावी, असं आवाहन नाबार्डचे व्यवस्थापक चेतन कुमार यांनी केलं. यावेळी सोमेश्वर इथले शेतकरी मोठय़ा संख्येनं उपस्थित होते.