मुंबई (वृत्तसंस्था) : अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे काटेकारेपणे पंचनामे करावेत असे निर्देश आपत्ती व्यवस्थापन, मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिले आहेत. वड्डेटीवार यांनी आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संबंधित अधिकाऱ्यांसोबत अतिवृष्टीमुळे बाधीत झालेल्या जिल्ह्यांविषयीची आढावा बैठक घेतली. कोणताही नुकसानग्रस्त मदतीपासून वंचित राहू नये याची खबरदारी घ्यायची सूचना त्यांनी या बैठकीत केली.

विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी आणि तहसिलदार यांनी पंचनामे केले जात अशा काही प्रातिनिधिक ठिकाणी भेट द्यावी, केलेल्या पंचनाम्यांची शहनिशा करावी, अतिवृष्टीदरम्यान विविध घटनांमुळे नुकसान झालेली पिकं आणि शेतजमीनी, घरं, पशुधन, रस्ते, जलाशयं, पायाभूत सुविधांच्या इमारती यांविषयीचा अहवाला शासनाला सादर करावी अशा सूचना त्यांनी केली. तातडीची मदत आवश्यक आहे असेल तिथे राष्ट्रीय आणि  राज्य आपत्ती प्रतिसाद दलाची मदत घ्यावी, मृत व्यक्तींच्या वारसदारांना तातडीनं मदतीचं वितरण करावं, असुरक्षित ठिकाणाच्या नागरिकांना तातडीनं सुरक्षित ठिकाणी हलवावे असे निर्देश त्यांनी दिले.

राज्य सरकारनं जुलै महिन्यात जाहिर केलेल्या मदतीचं वाटप करण्याबाबतही लवकरच निर्णय होणार आहे अशी माहिती वडेट्टीवार यांनी या बैठकीत दिली.