नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्री डॉक्टर वीरेंद्र कुमार यांनी आज भारतीय पॅरालिम्पिक्स खेळाडूंची आणि पदक विजेत्यांची भेट घेऊन त्यांना सन्मानित केलं. त्यांनी या खेळाडूंच्या प्रशिक्षकांचंही अभिनंदन केले. सुवर्ण पदक विजेत्यांना १० लाख रुपये रोख, रौप्य पदक विजेत्यांना ८ लाख रुपये रोख, आणि कास्य पदक विजेत्यांना ५ लाख रुपये रोख देऊन सन्मानित करण्यात आलं. सामाजिक न्याय आणि सबलीकरण राज्यमंत्री रामदास आठवले यावेळी उपस्थित होते. नुकत्याच झालेल्या टोकियो पॅरालिम्पिक्समध्ये भारताने आतापर्यंत ५४ क्रीडापटूनचा चमू पाठविला होता. या स्पर्धेत १९ पदकं जिंकून भारतीय पॅरालिम्पियन्सनी इतिहास घडविला.