नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : काश्मीरच्या दऱ्याखोऱ्यांमध्ये विस्थापित झालेल्या समाजाचं पुनर्वसन होणं गरजेचं असल्याचं जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल  मनोज सिन्हा यांनी आकाशवाणीवरील मासिक कार्यक्रम आवाम की आवाज यामध्ये म्हंटल आहे. हा कार्यक्रम जम्मू काश्मीर आकाशवाणी केंद्राच्या प्राथमिक वाहिनीवरून तसचं दूरदर्शनच्या डीडी काश्मीर वाहिनीवरून प्रक्षेपित केला जातो. विस्थापितांना  न्याय मिळण्याच्या हेतूने ऑनलाईन अर्ज भरण्याची सुविधा सुरु झाल्याची  माहिती त्यांनी यावेळी दिली. अनेक दशकांपासून सुरु असलेल्या हा अन्याय दूर करण्यासाठी आणि विस्थापितांच्या  कुटुंबियांना पुन्हा परत आणून खोऱ्यातील नष्ट होत चाललेली संस्कृती पूर्ववत होण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे असं ते यावेळी म्हणाले.