पुणे : पुणे विभागीय माहिती उपसंचालक डॉ.राजू पाटोदकर यांनी नुकताच आपला पदभार स्वीकारला आहे. त्याबद्दल असोसिएशन ऑफ स्मॉल ॲन्ड मिडीयम न्यूज पेपर्स ऑफ इंडियाच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले.
संघटनेचे पुणे जिल्हा अध्यक्ष श्री.सतिशचंद्र जकाते यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी संघटनेचे सल्लागार ॲड.मोहन अडसूळ, संघटनेचे पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष व साप्ताहिक एकच ध्येयचे संपादक श्री.महेश आनंदा लोंढे, दैनिक सांज समाचारचे संपादक श्री.विशाल बोत्रे, साप्ताहिक पब्लिक न्यूजचे संपादक श्री.पंजाबराव तळेकर, सत्य-काळचे संपादक श्री.शंकर शेंडगे, साप्ताहिक एकच ध्येयचे प्रतिनिधी श्री.अनिल दळवी, दैनिक सांज समाचारचे प्रतिनिधी श्री.उमेश कदम उपस्थित होते.
यावेळी वृत्तपत्रांच्या थकित बिलासंदर्भात चर्चा झाली. २ ते ३ दिवसात बिलाबाबत निर्णय होईल व संपादक/पत्रकार यांच्या काही मागण्या असतील तर त्याचा सकारात्मक विचार करण्यात येईल असे आश्वासन डॉ.पाटोदकर यांनी दिले.