मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात शासनाच्या कृषी विभागाच्या वतीने २४ ऑक्टोंबरपर्यंत हरभरा प्रमाणित बियाणे वितरण सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. त्याचा प्रारंभ कृषी मंत्री दादा भुसे यांच्या हस्ते काल सायंकाळी नाशिक जिल्ह्यात पिंपळगाव जवळ आंतरवेली इथं झाला. जिल्ह्यासाठी आठ हजार क्विंटल बियाणं सवलतीच्या दरात विक्री करण्यात येणार आहे. भुसे यांच्या हस्ते स्वयंचलित माती परीक्षण यंत्राचं उद्घाटनही करण्यात आले. कार्यक्रमाला जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, आमदार दिलीप बनकर, विभागीय कृषी सहसंचालक यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.