नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आगामी सणांच्या पार्श्वभूमिवर कोरोना नियंत्रण प्रतिबंधांबाबतच्या निर्बंधांत कोणतीही सवलत न देण्याबाबतच्या सूचना केंद्र सरकारनं राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांना दिल्या आहेत. कोविड प्रतिबंधांच्या मार्गदर्शक सूचनांचं पालन सर्वांनी सक्तीनं केलं पाहिजे. कोरोना संक्रमित विभाग आणि पाच टक्कयांहून अधिक कोरोना संक्रमण असलेल्या जिल्ह्यांतील लोकांना मोठ्या संख्येनं एकत्र येण्याबाबत परवानगी देऊ नये. राज्य सरकारं आणि केंद्रशासित प्रदेशांनी याबाबत काळजी घ्यायची असून आवश्यक ते दिशा निर्देश जारी करण्याबाबतच्या सूचना दिल्या आहेत. ज्या समारंभांत मोठ्या संखयेनं एकत्र यायला अगोदरंच परवानगी दिली आहे. त्यांच्यावर लक्ष ठेवण्याचे आणि नियमांचे उल्लंघन झाल्यास दंडात्मक कारवाई करण्याबाबतचे निर्देश केंद्रसरकारनं दिले आहेत.