नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नैऋत्य मान्सूननं काल संपूर्ण देशातून माघार घेतली. १९७५ सातव्यांदा मान्सून माघारी जायला एवढा उशीर झाला असं भारतीय हवामान विभागानं सांगितलं आहे. यंदा सलग तिसऱ्यावर्षी देशात नैऋत्य मान्सूनमुळं साधारण पाऊस पडला. या काळात देशात सरासरी ८७ सेंटीमीटर पाऊस झाला. आग्नेय मान्सूननं सुरू झालेला पाऊस काल पासून दक्षिणेतल्या द्वीपकल्पांवर सुरू झाला. यामुळं दक्षिणेकडच्या राज्यात ऑक्टोबर ते डिसेंबर दरम्यान पाऊस पडतो. यंदा हा पाऊस सर्वसाधारण असेल, असं हवामान विभागानं म्हटलं आहे.