मुंबई (वृत्तसंस्था) : कोविडमुळे अनाथ झालेल्या बालकांना आणि विधवांना शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी ‘मिशन वात्सल्य’ ही योजना राज्यात अभियान स्तरावर राबवण्याचे निर्देश महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी दिले आहेत. मिशन वात्सल्यबाबत विभागीय स्तरावर महिन्यातून एकदा, जिल्हास्तरावर महिन्यातून दोनदा आणि तालुकास्तरावर आठवड्यातून एक बैठक घ्यावी. तसंच या सर्व बैठकीचा आढावा महिला आणि बालविकास आयुक्तांना पाठवावा, अशा सूचना त्यांनी दिल्या. अभियानाच्या अंमलबजावणीसाठी राज्यातल्या सर्व तालुक्यांमध्ये तालुका समन्वय समिती गठीत केली असून सर्व तालुक्यांमधल्या विधवा महिलांचं सर्वेक्षण करण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत.