नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या ३ डिसेंबरला फिनटेक अर्थात अर्थविषयक तंत्रज्ञानासंबंधीत ‘इन्फिनिटी फोरम’, या विचार मंचाचं दूरदृष्य प्रकल्पाचं आयोजन प्रणालीद्वारे उद्घाटन करणार आहेत. आंतरराष्ट्रीय अर्थ सेवा केंद्र प्राधिकारणानं केंद्र सरकारच्या साहाय्याने आयोजित केलेल्या या उपक्रमात इंडोनेशिया, दक्षिण आफ्रिका आणि युनायटेड किंगडम हे देश सहआयोजक आहेत. या मंचामुळे धोरण निश्चिती, तंत्रज्ञान, व्यापार क्षेत्रातले जगभरातले विचारवंत प्रथमच एकत्र येत असून, ‘फिनटेक’ मध्ये तंत्रज्ञान आणि नवीनता कशी आणता येईल याविषयी विचारविमर्ष होणार आहे. तसंच या क्षेत्राचा विकास आणि त्याद्वारे अधिकाधिक लोकांना सेवा देण्यासंबधीही चर्चा होणार आहे.