नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नागालँडमध्ये झालेल्या गोळीबार प्रकरणात राष्ट्रीय  मानवी हक्क आयोगानं केंद्र तसंच नागालँड सरकारला नोटीस पाठवली आहे. घडलेल्या घटनेची विस्तृत माहिती ६ आठवड्याच्या आत कळवावी असं आयोगानं या नोटिशीत म्हटलं आहे. नागालँडमध्ये सैन्यदलाकडून सामान्य नागरिकांवर झालेल्या गोळीबाराच्या प्रसारमाध्यमातल्या  बातम्यांची दाखल घेत मानवी हक्क आयोगानं ही नोटीस जारी  केली आहे. दरम्यान, नागालँडमध्ये झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर राज्यात साजरा  होणारा  हॉर्नबिल महोत्सव रद्द  करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे.