नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड-१९ विषाणूच्या उच्चाटनासाठीच्या देशात सुरू असलेल्या लसीकरण मोहिमेनं १४८ कोटींचा टप्पा ओलांडला. कालच्या एका दिवसातच तब्बल ८७ लाख लसींच्या मात्रा देण्यात आल्या. यापैकी ३७ लाख ५१ हजार लसींच्या मात्रा १५ ते १८ वर्षं वयोगटातल्या मुलांना देण्यात आल्या आहेत. आत्तापर्यंत या वयोगटातल्या ८१ लाख ४५ हजार मुलांना लसीची पहिली मात्रा देण्यात आल्याचं वृत्त आहे.