मुंबई : केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या कंबाइन्ड डिफेंस सर्विसेस (सीडीएस) परीक्षेत देशातून पहिला आलेला अपूर्व पडघान याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कौतुक केले आहे. मंत्रालयात उपमुख्यमंत्री यांच्या दालनात पुष्पगुच्छ देऊन श्री.पवार यांनी अभिनंदन केले. यावेळी अन्न व औषध प्रशासनमंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे उपस्थित होते.
मूळचा बुलडाणा जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या अपूर्व पडघान याने नागपूर येथील एनआयटी अभियांत्रिकी महाविद्यालयातून मेकॅनिकल इंजिनिअरिंग या विषयात पदवी घेतली आहे. त्याचे वडील पोलीस विभागात कार्यरत आहेत. एअर फोर्समध्ये पुढे काम करण्याचे अपूर्व पडघान याने ठरविले आहे. अपूर्वच्या या निवडीमुळे ग्रामीण भागातून या क्षेत्रात येऊ इच्छिणाऱ्या युवकांसाठी प्रेरणा मिळणार आहे, असे उद्गार मान्यवरांनी काढले.