नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशव्यापी लसीकरण मोहिमेत देशात आतापर्यंत १५६ कोटी ९० लाखापेक्षा जास्त मात्रा लाभार्थ्यांना मिळाल्या आहेत. यात ६५ कोटी ४८ लाखापेक्षा जास्त लाभार्थ्यांना लशीच्या दोन्ही मात्रा मिळाल्या आहेत. तर, ४२ लाख २१ हजारपेक्षा जास्त पात्र लाभार्थ्यांना वर्धक मात्रा मिळाली आहे. आज सकाळपासून सुमारे १४ लाख नागरिकांचं लसीकरण झालं आहे. राज्यात आज सकाळपासून २५ हजारापेक्षा जास्त नागरिकांचं लसीकरण झालय. त्यामुळे राज्यात आतापर्यंत लाभार्थ्यांना दिलेल्या मात्रांची एकूण संख्या सुमारे १४ कोटी ३१ लाख झाली आहे. यात ५ कोटी ८० लाख ४३ हजारापेक्षा जास्त नागरिकांनी लशीच्या दोन्ही मात्रा घेतल्या आहेत. तर, ३ लाख २२ हजारापेक्षा जास्त पात्र लाभार्थ्यांना वर्धक मात्रा मिळाली आहे.