पुणे : पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा विमुक्त जाती व भटक्या जमाती विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा आदिवासी विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा शासकीय विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा इयत्ता 5 वी आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता  दि. 16 फेब्रुवारी 2020 रोजी आयोजित करण्यात आली आहे. असे  पुणे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांनी कळविले आहे.

शासनमान्य शाळांमधून 2019-20 या शैक्षणिक वर्षात इयत्ता 5 वी मध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांमधील पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा, विमुक्त जाती व भटक्या जमाती विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा, आदिवासी विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा व शासकीय विद्यानिकेतन प्रवेश परीक्षेमध्ये प्रविष्ठ होण्यासाठी तसेच  इयत्ता ८ वी मध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांमधील पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेस प्रविष्ठ होण्यासाठी अधिसूचनेत नमूद केलेल्या अटी पूर्ण करणाऱ्या व या परीक्षेस प्रविष्ठ होण्यास इच्छुक असणाऱ्या विद्यार्थ्यांची ऑनलाईन आवेदनपत्र परिषदेच्या www.mscepune.in व http://puppss.mscescholarshipexam.in या संकेतस्थळावर दि.१ ऑक्टोबर २०१९ पासून उपलब्ध करून देण्यात येत आहे.

परीक्षा दिनांक 16 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्हयांमध्ये एकाच वेळी घेण्यात येईल, असेही पुणे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे  आयुक्त श्री. सुपे यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.