मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबई-पुण्यासह राज्यात काही ठिकाणी कोरोना रुग्णसंख्या कमी होताना दिसते आहे. त्यामुळं निर्बंध कमी करण्याकडे राज्य सरकारचा कल आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. मार्चअखेरपर्यंत राज्यातली कोरोनाची तिसरी लाट आटोक्यात येईल, असं तज्ञांचं मत असल्याचंही त्यांनी सांगितलं.