नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री गती शक्ती योजनेच्या राष्ट्रीय योजनेअंतर्गत रस्ते विकास आणि महामार्ग मंत्रालय २२ नवीन राष्ट्रीय महामार्ग, २३ प्रमुख पायाभूत सुविधा योजना, आणि ३५ मल्टी-मॉडल लॉजिस्टिक्स पार्क विकसित करणार आहे.

दिल्ली-मुंबई द्रुतगती महामार्ग, अहमदाबाद-धोलेरा द्रुतगती महामार्ग, दिल्ली-अमृतसर-कटरा द्रुतगती महामार्ग आणि बंगळुरू-चेन्नई द्रुतगती महामार्ग या प्रकल्पांचा या योजनेत  समावेश आहे. तर निर्माण होत असलेल्या काही महत्वाच्या पायाभूत प्रकल्पांमध्ये लडाखमधला झोजिला बोगदा, आंध्रप्रदेशमध्ये कृष्णापत्तनम बंदराला जोडणारे रस्ते आणि अरुणाचल प्रदेशातल्या लालपुल-मनमाओ रस्त्याचं दुपदरीकरण याचा समावेश आहे.