नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चालू आर्थिक वर्षात देशात अन्न धान्यांचं विक्रमी उत्पादन होण्याचा अंदाज आहे. या काळात ३१६ दशलक्ष टन धान्याचं उत्पादन होण्याची शक्यता असल्याची माहिती कृषीमंत्रालयानं दिली आहे. हे उत्पादन गेल्यावर्षीच्या तुलनेत ५ पूर्णांक ३२ दशलक्ष टन जास्त आहे. कृषी संशोधकांचं संशोधन आणि शेतकऱ्यांच्या अथक प्रयत्नांच हे फलित असल्याचं कृषीमंत्री नरेंद्रसिंग तोमर यांनी म्हटलं आहे.