नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : युक्रेन आणि रशिया यांच्यातल्या वादावर सर्व सहमतीनं तोडगा काढावा आणि सर्व पक्षांनी संयम राखावा असं आवाहन भारतानं केलं आहे.

युक्रेनसह अमेरिका आणि ब्रिटनने बोलावलेल्या संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या आणीबाणीच्या सत्रादरम्यान, भारताने रशिया आणि युक्रेनच्या सीमेवर वाढलेल्या तणावाबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली. या वादावर शांतपणे आणि विधायकरीत्या विचार करून उपाय शोधणं ही काळाची गरज असल्याचे संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेतले भारताचे स्थायी प्रतिनिधी टी एस थिरुमूर्ती यांनी यावेळी सांगितलं. व्यापक हित लक्षात घेऊन आंतरराष्ट्रीय पातळीवर शांततेचा भंग होईल असं कृत्य करणं टाळायला हवं, असं ते म्हणाले.