नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि बांगलादेश यांच्यात व्यापार वाढवण्याच्या प्रयत्नांमध्ये दोघांमधल्या दळणवळण यंत्रणेचा वाटा मोठा आहे, असं बांगलादेशचे माहिती आणि प्रसारण मंत्री डॉक्टर हसन महमूद यांनी काल सांगितलं. गुवाहाटी इथं पहिल्या बांगलादेश चित्रपट महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. भारत, आणि विशेषतः आसामबरोबर जलमार्ग, रेल्वेमार्ग आणि हवाई मार्गाद्वारे दळणवळण वाढवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं महमूद यांनी सांगितलं.या चित्रपट महोत्सवादरम्यान गुवाहाटीमधली विविध विद्यापीठं आणि महाविद्यालयांमध्ये बांगलादेश मुक्ती संग्रमाशी संबंधित 32 चित्रपट दाखवले जाणार आहेत.