नवी दिल्ली : राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्या हस्ते राष्ट्रपती भवनात राष्ट्रीय सेवा योजना पुरस्कार 2017-18 चे वितरण करण्यात आले. यावेळी केंद्रीय क्रीडा आणि युवक व्यवहार राज्यमंत्री किरेन रिजीजू यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

तमिळनाडूतील तिरुचिरापल्ली इथल्या भारतीदासन विद्यापीठाने पहिला क्रमांक पटकावला. मुंबईच्या के.सी. कॉलेजलाही यावेळी पुरस्काराने गौरवण्यात आले. राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम प्रभावीपणे राबवल्याबद्दल प्राचार्या डॉ. हेमलता बागला यांना एक लाख रुपयांचे रोख बक्षीस आणि चषक प्रदान करण्यात आले तर कार्यक्रम अधिकारी डॉ. सतीश कोलते यांना रौप्य पदक, प्रमाणपत्र आणि 70,000 रुपयांचा रोख पुरस्कार देण्यात आला. वैयक्तिक गटात उत्कृष्ट स्वयंसेवकाचा पुरस्कारही महाराष्ट्रातल्या सचिन ढोले या विद्यार्थ्याला देण्यात आला. रौप्य पदक, प्रमाणपत्र आणि 50,000 रुपये रोख असे या पुरस्कारचे स्वरुप आहे.