नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : एका सरकारी समितीनं वर्धक मात्रेसाठी स्पुतनिक लाइट लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीसाठी परवानगी देण्याची शिफारस केली आहे. ही शिफारस अंतिम मंजुरीसाठी DCGI म्हणजे भारतीय औषध नियामक मंडळाकडे पाठवण्यात आल्या आहेत.

हैदराबाद इथल्या डॉक्टर रेड्डीज प्रयोगशाळेनं बूस्टर डोस म्हणून स्पुटनिक लाइट लसीची तिसऱ्या टप्प्यातील चाचणी घेण्याचा प्रस्ताव DCGI कडे सादर केला होता. त्यानुसार DCGI नं 4 फेब्रुवारी रोजी काही नियामक तरतुदींच्या अंतर्गत भारतात स्पुतनिक लाइट लसीला आपत्कालीन वापराची परवानगी दिली होती.

अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार CDSCO च्या कोविड 19 वरील विषय तज्ञ समितीनं यावर तपशीलवार विचार विनिमय करून अर्जाची पुन्हा छाननी करून, स्पुतनिक लाइट लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील वैद्यकीय चाचणीसाठी, काही नियामक तरतुदींनुसार परवानगी देण्याची शिफारस केली आहे. स्पुतनिक लाइट लसीला अर्जेंटिना आणि रशियासह 29 देशांमध्ये मान्यता आहे.