नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नेपाळने सर्वात जास्त प्रमाणात आकाशवाणी ऐकणाऱ्या देशांच्या गटात पहिल्यांदाच प्रवेश केला असल्याची माहिती, माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं दिली आहे.
नेपाळमधे विविध भारती नॅशनल, एआयआर उटी, एफएम रेनबो दिल्ली, एआयआर न्यूज 24×7, व्हीबीएस दिल्ली, एफएम रेनबो मुंबई, एफएम गोल्ड मुंबई आणि एआयआर शिमला या आकाशवाणीच्या सेवा सर्वात जास्त ऐकल्या जातात.
240 हून अधिक रेडिओ सेवा प्रसार भारतीचे अधिकृत अॅप न्यूजऑनएअर अॅपवर थेट-प्रक्षेपित केल्या जातात. NewsOnAir अॅपवरील आकाशवाणीचे श्रोते भारतातच नव्हे तर जगभरात 85 हून अधिक देशांमधे आहेत.